If you are an avid Reader, Click Here to Sign in. Create bookmarks, post comments, engage in discussion with authors and other readers, increase your knowledge, proficiency in language, earn points and compare and share with others.

"वात्सल्याची मूर्ती" 

 • दिवस आला शाळेचा
 • हातात पाटी पेंसिल धरण्याचा ,
 • मनात होती भिती की
 • गुरूजी देतील छडी मला

 

 • तेव्हा सहारा देत म्हणणारे
 • " केल्याने होत आहे रे ,
 • आधी केलेच पाहिजे "
 • असे आहेत 'बाबा' माझे

 

 • माझे बोट धरुन वाटेने चालणारे
 • प्रेमाचा, हळव्या स्पर्शाचा गंध देणारे ,
 • विनोदाचे बोलून हास्यस्फोट करणारे
 • असे आहेत 'बाबा' माझे

 

 • रिमझिम पावसाच्या सरीत
 • छत्री घेवुनिया हाती ,
 • येतात शाळेमधी
 • मला नेण्यासाठी

 

 • समजावून देत समाजाच्या रीती
 • हीच तर आहे बाबांची अबोल प्रिती ,
 • पाठीवरून हात गोंजारणारे
 • असे आहेत 'बाबा' माझे ज्ञान व्यक्ती

 

 • देवा तुझ्या चरणी
 • ही एकच प्रार्थना माझी ,
 • हीच ' वात्सल्याची मूर्ती '
 • मिळो मला जन्मोजन्मी .

 

                                              - राधिका अनिल राठी
Author

Radhika Rathi
Last Online: Wednesday 01/08/18 | Published on: Thursday 07/06/18

Radhika Rathi is the author of this content.

Share this page and spread the word!

Liked the Article? Review it here:

1       2       3       4       5      

Reader Reviews and Feedback:

No Reviews Yet...

Size:      || Mode:               || PlayStyle:            || Play: